महापालिकेच्या कर्मचार्‍याला दमदाटी; नगरसेवकावर गुन्हा
Featured

महापालिकेच्या कर्मचार्‍याला दमदाटी; नगरसेवकावर गुन्हा

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहराला पाणी पुरवठा करणार्‍या महापालिकेच्या कर्मचार्‍याला नगरसेेवकाने शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना गुरूवारी (दि. 20) रात्री साडेअकराच्या सुमारास सारसनगर परिसरात घडली.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात नगरसेेवक प्रकाश भानानगरे ( रा. रेल्वे स्टेशन) विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पाणी पुरवठा कर्मचारी बापू काशिनाथ फाळके (वय- 50 रा. केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

फाळके महापालिकेत पाणी पुरवठा विभागात नोकरी करतात. गुरूवारी रात्री ते सारसनगर ते संदीपनगर असे पाणी सोडण्याचे काम करत होते. यावेळी आरोपी भानानगरे तेथे आले. फाळके यांना ‘तू फोन का बंद ठेवला’, असे म्हणत फाळके यांना शिवीगाळ करत धमकी दिली.

या प्रकरणी फाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भानानगरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com