पुण्यात 5 हजार 181 करोनाबाधित
Featured

पुण्यात 5 हजार 181 करोनाबाधित

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मंगळवारी पुणे शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या तब्बल 5 हजार 181 इतकी झाली तर 264 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर पुणे जिल्ह्यात मंगळवारी दुपारपर्यंत 6 हजार 303 बाधित रुग्ण असून यातील 3 हजार 195 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 2 हजार 819 इतकी आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 208 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

दरम्यान पुणे विभागात विभागात करोना बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 719 इतकी झाली आहे. यातील 3 हजार 674 जण करोना मुक्त झाले आहेत. तर 3 हजार 689 क्टिव्ह रुग्ण आहेत. विभागात एकूण 366 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 215 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

25 मे रोजीच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येत एकूण 501 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 404, सातारा जिल्ह्यात 26, सोलापूर जिल्ह्यात 31, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 37 असे रुग्ण वाढले आहेत.
सातारा जिल्ह्यात 335 करोना बाधित रुग्ण असून 126 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टिव्ह रुग्ण संख्या 201 आहे. करोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 621 बाधित रुग्ण असून 291 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 275 इतकी आहे. बाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील बाधित 82 रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 33 आहे. बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित 378 रुग्ण असून 15 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 361 इतकी आहे. बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आजपर्यंत विभागामध्ये एकूण 74 हजार 968 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 67 हजार 517 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 7 हजार 451 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 59 हजार 688 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 7 हजार 719 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ससूनमध्ये आतापर्यंत 143 जणांचा मृत्यू
पुण्यातील ससून रुग्णालयात चार करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं ससूनमध्ये आतापर्यंत 143 बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. तर चार करोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 143 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. ससूनला डिस्चार्ज रुग्ण आणि मृत रुग्णांची संख्या सारखीच आहे.
मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे. येरवडा परिसरातील तीस वर्षीय करोना बाधित महिलेचा मृत्यू झालाय. या महिलेला करोना सह, उच्च रक्तदाब, हायपोथायरॉईड व्याधी होती्.
तर डिस्चार्ज रुग्णांमध्ये तीन महिला आणि एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे. डिस्चार्ज रुग्णांमध्ये 24, 28, 30 आणि 39 वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे्.

Deshdoot
www.deshdoot.com