Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे : 3 हजार 355 करोना रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : 3 हजार 355 करोना रुग्णांना डिस्चार्ज

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्हयातील 3 हजार 355 रुग्ण बुधवारी दुपारपर्यंत बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 954 इतकी आहे. आतापर्यंत करोनाबाधित एकूण 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 193 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
पुणे जिल्ह्यातील बुधवारी दुपार पर्यंतची करोना बाधित एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 604 इतकी झाली आहे. मात्र, त्यातील 50 टक्यांपेक्षा जास्त रुग्ण (3 हजार 355) रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, पुणे विभागातील 3 हजार 841 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात करोना बाधीत रुग्णांची संख्या 8 हजार 122 झाली आहे. तर अ‍ॅक्टीव रुग्ण 3 हजार 904 आहे. विभागात करोनाबाधीत एकुण 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 200 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 403 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 59, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 6, कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 394 करोना बाधीत रुग्ण असून 122 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 259 आहे. करोनाबाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 653 करोना बाधीत रुग्ण असून 297 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 292 आहे. करोना बाधित एकूण 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील करोना बाधीत 88 रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 39 आहे. करोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 383 करोना बाधीत रुग्ण असून 20 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 360 आहे. करोना बाधित एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोना नियंत्रित ठेवण्याची ही कसोटीची वेळ
विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात करोना प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. कंन्टेटमेंट झोनमध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांची आरोग्य तपासणी करून गतीने उपचार सुरू करावेत, असे म्हैसेकर म्हणाले. करोना नियंत्रित ठेवण्याची ही कसोटीची वेळ असल्याचेही ते म्हणाले.
करोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता करोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करा, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयातून विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व करोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेले आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेतला.
आपत्ती लक्षात घेता महानगरपालिका आणि इतर यंत्रणांमार्फत विविध प्रतिबंधात्मनक उपाययोजना करण्यामत येत आहेत. यासोबतच परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन केल्यास अधिक प्रभावीपणे काम करणे सुलभ होईल आणि करोना प्रतिबंधासाठी उपयोग होईल. मृत्यूदर कमी करण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन आवश्यक आहे. पल्स ऑक्सीमीटर, बीपी तपासणी तसेच शुगर तपासणीला प्राधान्य देण्यात यावे, आरोग्य सर्वेक्षण अचूक असावे व त्यातून एकही व्यक्ती सुटणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

27 मे – अपडेट
.
– दिवसभरात 106 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 184 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात 11 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
– 171 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 50 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 5533.
(डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-5074 आणि ससून 459)
– पुण्यातील क्टिव्ह रुग्ण संख्या- 2190.
– एकूण मृत्यू-283.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 3059.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 1360.

- Advertisment -

ताज्या बातम्या