पुण्यात आज 399 नवे करोना रुग्ण, 10 मृत्यू; 175 जणांना डिस्चार्ज
Featured

पुण्यात आज 399 नवे करोना रुग्ण, 10 मृत्यू; 175 जणांना डिस्चार्ज

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहरात सोमवारी तब्बल 399 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली. आतापर्यंतचे एका दिवसातील ही विक्रमी नवीन रुग्णवाढ आहे. त्यामुळे पुण्यातील करोना रुग्णांची संख्या रुग्णांच्या संख्येने पाच हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

पाच हजार 181 वर बाधित रुग्णांची संख्या पोहोचली. तर दिवसभरात दहा बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळं आतापर्यंत 264 बाधित रुग्ण दगावलेत. तर दिवसभरात 175 रुग्ण डिस्चार्ज झाले.

आतापर्यंत 2735 रुग्ण डिस्चार्ज झाले असून अ‍ॅक्टिव रुग्णांपेक्षा घरी जाणार्‍या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. पुण्यात सध्या 2182 अ‍ॅक्टिव रुग्ण असून 179 क्रिटिकल आणि 44 व्हेंटिलेटरवर आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com