करोना : पुणे विभागातील 3 हजार 321 जणांना डिस्चार्ज

करोना : पुणे विभागातील 3 हजार 321 जणांना डिस्चार्ज

सार्वमत

पुणे – पुणे विभागातील 3 हजार 321 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर विभागात आतापर्यंत करोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 823 झाली आहे. तर अ‍ॅक्टीव रुग्ण 3 हजार 178 आहे. विभागात करोना बाधीत एकुण 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 210 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयात 5 हजार 616 बाधीत रुग्ण असून करोना बाधित 2 हजार 905 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 444 आहे. करोनाबाधित एकूण 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 204 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

शनिवारच्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत आज पुणे विभागात एकूण 336 बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 249, सातारा जिल्ह्यात 37, सोलापूर जिल्ह्यात 22, सांगली जिल्ह्यात 3 तर कोल्हापूर जिल्ह्यात 25 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयात 278 करोना बाधीत रुग्ण असून 114 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅअ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 157 आहे. करोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयात 570 करोना बाधीत रुग्ण असून 249 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅअ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 275 आहे. करोना बाधित एकूण 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयात 73 करोना बाधीत रुग्ण असून 40 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅअ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 31 आहे. करोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयात 286 करोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅअ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 271 आहे. करोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 71 हजार 111 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 62 हजार 159 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 8 हजार 966 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 55 हजार 253 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 6 हजार 823 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 31 लाख 30 हजार 901 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 5 कोटी 84 लाख 54 हजार 69 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 758 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com