Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे विभागात 8 हजार 862 रुग्णांची करोनावर मात

पुणे विभागात 8 हजार 862 रुग्णांची करोनावर मात

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – जिल्ह्यासह पुणे विभागातील रुग्णांची संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढलं आहे. पुणे विभागात बर्‍या होणार्‍या रुग्णांच्या संख्येनं 8 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. विभागात बर्‍या होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 62.95 टक्के आहे. विभागात 8 हजार 862 करोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

- Advertisement -

विभागात सध्या 14 हजार 77 बाधित रुग्ण आहेत. यापैकी 4 हजार 575 क्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यातील 286 रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत विभागात 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात करोनाचा सर्वाधिक जास्त प्रादुर्भाव पुणे जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यात 10 हजार 973 बाधित रुग्ण आहेत. यातील 6 हजार 912 रुग्ण बरे झाले. तर सध्या 3 हजार 596 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यातील 259 रुग्ण गंभीर आहेत. जिल्ह्यात बर्‍या होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 62.99 टक्के आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 465 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यात 704 करोना बाधित रुग्ण आहेत. यातील 448 बाधित रुग्ण बरे झाले. सध्या 227 जण अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. सातार्‍यात आतापर्यंत 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 504 करोना बाधित रुग्ण आहेत. यापैकी 805 बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले. सध्या 567 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. सोलापूरमध्ये एकूण 132 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात 192 करोना बाधित रुग्ण आहेत. यापैकी 103 बाधित रुग्ण बरे झाले. 83 क्टीव्ह रुग्ण आहेत. सांगलीत आतापर्यंत 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात 704 करोना बाधित रुग्ण असून 594 बाधित रुग्ण बर झाले आहेत. येथे 102 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या