Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आतापर्यंत 10 हजार 973 करोनाबाधित

पुण्यात आतापर्यंत 10 हजार 973 करोनाबाधित

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्हयात शुक्रवार दुपारपर्यंत 10 हजार 973 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 6 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 596 आहे. कोरोनाबाधित एकूण 465 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 259 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.99 टक्के आहे.

- Advertisement -

दरम्यान, पुणे विभागातील 8 हजार 862 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 हजार 077 झाली आहे. तर अ‍ॅक्टीव रुग्ण 04 हजार 575 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 286 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बर्‍या होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 62.95 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 452 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 330, सातारा जिल्ह्यात 15, सोलापूर जिल्ह्यात 92, सांगली जिल्ह्यात 06 तर कोल्हापूर जिल्ह्यात 09 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील 704 कोरोना बाधीत रुग्ण असून 448 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 227 आहे. कोरोनाबाधित एकूण 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 1504 कोरोना बाधीत रुग्ण असून 805 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 567 आहे. कोरोना बाधित एकूण 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील 192 कोरोना बाधीत रुग्ण असून 103 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 83 आहे. कोरोना बाधित एकूण 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 704 कोरोना बाधीत रुग्ण असून 594 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 102 आहे. कोरोना बाधित एकूण 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या