पुण्यात आतापर्यंत 9 हजार 115 जण करोनाबाधित
Featured

पुण्यात आतापर्यंत 9 हजार 115 जण करोनाबाधित

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्हयात शनिवारी दुपारपर्यंत करोना बाधीत रुग्णांची संख्या 9115 इतकी झाली आहे तर 5637 करोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 3077 आहे. पुणे जिल्हयात करोनाबाधीत एकुण 401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 220 रुग्णगंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

दरम्यान, पुणे विभागातील करोना बाधीत रुग्णांची संख्या 11723 झाली आहे.विभागातील 6981 करोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरीगेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 4203 आहे.विभागात करोनाबाधीत एकुण 539 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 231 रुग्णगंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रूग्णसंख्येच्या तुलनेत आज विभागात बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये एकूण 283 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयात 199,सातारा जिल्हयात 19, सोलापूर जिल्हयात 50,सांगली जिल्हयात 9 तर कोल्हापूर जिल्हयात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 98394 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 94343 चा अहवाल प्राप्त आहे. 4051 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 82461 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 11723 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

Deshdoot
www.deshdoot.com