राज्यात दिवसभरात 3 हजार नवे करोनाग्रस्त; 58 मृत्यू
Featured

राज्यात दिवसभरात 3 हजार नवे करोनाग्रस्त; 58 मृत्यू

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – राज्यात आज दिवसभरात 3041 करोना रुग्ण आढळले असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत करोना रुग्णांची संख्या 50 हजार 231 झाली आहे.
राज्यात आज 1196 करोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 14 हजार 600 एवढी झाली आहे. अद्याप 33 हजार 988 करोना रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्यात 14 हजार 600 रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. तसेच राज्यात 4 लाख 99 हजार 387 लोकांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले असून 35 हजार 107 संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.आज दगावलेल्या रुग्णांमध्ये मुंबईत 39, पुण्यात 6, सोलापूर 6, औरंगाबाद 4, लातूर, मीरा भाईंदर आणि ठाण्यातील प्रत्येकी एकाचा समाववेश आहे. मृतांमध्ये 34 पुरूष आणि 24 महिलांचा समावेश आहे.

मुंबईतील करोना रुग्णांची संख्या 30 हजार 542 असून मृतांची एकूण संख्या 988 झाली आहे. ठाण्यात आतापर्यंत 420 रुग्णांची नोंद झाली असून 4जण दगावले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात 2590 रुग्णांची नोंद झाली असून 36 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्येही करोनाबाधितांची संख्या 2 हजार 7 झाली असून मृतांची संख्या 29 झाली आहे. कल्याण-डोंबिवलीतील करोना रुग्णांची संख्या 889 झाली असून मृतांचा आकडा 7वर गेला असून उल्हासनगरमधील करोना रुग्णांची संख्या 169वर गेली असून तीन जण दगावले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com