कोरोना : नेवासा तालुक्यातील परिस्थितीचा ना. गडाख यांनी घेतला आढावा
Featured

कोरोना : नेवासा तालुक्यातील परिस्थितीचा ना. गडाख यांनी घेतला आढावा

Dhananjay Shinde

सार्वमत

नेवासा (का. प्रतिनिधी ) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील विविध गावातील असलेल्या परिस्थिती संदर्भात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज रविवारी सकाळी नेवासा तहसील कार्यालयात तहसीलदार, पोलीस, आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून विविध सूचना केल्या व जिल्हाधिकारी यांच्याशी जिल्ह्यातील परिस्थिती बाबत चर्चा केली.

तालुक्यात किती लोक शहरातून आले आहे , परराज्यातील किती मजदूर तालुक्यात आहे, गोरगरीब लोकांना रेशनचे धान्य चांगल्या पद्धतीने मिळत आहे का ? तालुक्यातील किती लोकांना घरात कोरंटाईन केले आहे दुर्दैवाने परिस्थिती वाढली तर पुढच्या उपाययोजना कशा कराव्या लागतील याबाबत चर्चा केली.

Deshdoot
www.deshdoot.com