Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आतापर्यंत 2 हजार 395 करोनाग्रस्त

पुण्यात आतापर्यंत 2 हजार 395 करोनाग्रस्त

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 2 हजार 395 इतकी झाली असून 680 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 587 आहे तर कोरोनाबाधित एकूण 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 88 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
दरम्यान, पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 734 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 1 हजार 842 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 142 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 94 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 395 बाधीत रुग्ण असून 680 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 1 हजार 587 आहे. कोरोनाबाधित एकूण 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 88 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयातील 113 कोरोना बाधीत रुग्ण असून 14 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 176 कोरोना बाधीत रुग्ण असून 24 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 142 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 35 कोरोना बाधीत रुग्ण असून 26 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 15 कोरोना बाधीत रुग्ण असून 6 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 27 हजार 429 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 26 हजार 301 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 186 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 23 हजार 509 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 734 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 82 लाख 12 हजार 122 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 26 लाख 74 हजार 234 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 956 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

- Advertisement -

पुण्यात कोरोना बाधित रुग्ण दुप्पट होण्याचा वेग सहा ते सात दिवसांवरून दहा दिवसांच्या पुढे
पुणे (प्रतिनिधि) – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने चिंताग्रस्त झालेल्या पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. पुण्यामध्ये साधारणपणे 15 दिवसांपुर्वी कोरोना बाधित रुग्ण दुप्पट होण्याचा वेग सहा ते सात दिवसांवरून दहा दिवसांच्या पुढे गेला आहे. तर बाधित रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचा वेग त्यापेक्षा जास्त आहे. दर चार ते पाच दिवसांनी कोरोनामुक्त रुग्णांमध्ये दुपटीने वाढ होत असल्याचे चित्र आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही 600 च्या वर गेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित नवीन रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. दररोज हा आकडा 80 ते 100 च्या घरात आहे. त्यामुळे बाधित तसेच संशयित रुग्णांना दाखल करण्यासाठी महापालिका प्रशासनाला खासगी रुग्णालयांसह शैक्षणिक संस्थांच्या वसतिगृहांचा आधार घ्यावा लागत आहे. पण असे असले तरी प्रत्यक्ष रुग्णवाढीचा वेग मागील काही दिवसांत तुलनेने वाढल्याचे दिसत आहे. साधारणपणे 15 दिवसांपुर्वी रुग्ण दुप्पट होण्याचा वेग सहा ते सात दिवस एवढा होता. आता हा वेग दहा दिवसांच्या पुढे गेला आहे. तर बाधित रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचा वेग त्यापेक्षा जास्त आहे. दर चार ते पाच दिवसांनी कोरोनामुक्त रुग्णांमध्ये दुपटीने वाढ होत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, दि. 20 एप्रिल रोजी एकुण बाधित रुग्ण 666 तर कोरोनामुक्त रुग्ण 68 एवढे होते. पुढील पाच दिवसांत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा दुपटीहून अधिक होता. तर बाधित रुग्णांचा आकडा दुप्पट होण्यासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर हा कालावधी वाढतच चालला आहे. दि. 25 मे रोजी एकुण 1 हजार 70 रुग्ण बाधित होते. हा आकडा दुप्पट होण्यासाठी जवळपास 12 दिवसांहून अधिक कालावधी लागल्याचे दिसत आहे. त्यातुलनेत बरे होणार्‍या रुग्णांच्या प्रमाणात सातत्य राहिले आहे. रुग्णांची चाचणी घेतल्यापासून पुढील 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाते. त्यानंतर 14 व्या व 15 व्या दिवशी त्याची चाचणी घेऊन ती निगेटिव्ह आल्यास घरी सोडले जात आहे. बहुतेक रुग्णांच्या चाचण्या 14 दिवसांनी निगेटिव्ह येत असल्याने कोरोनामुक्त रुग्णांच्या प्रमाणात सातत्य दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या