करोना : पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात 200 रुग्ण
Featured

करोना : पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात 200 रुग्ण

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे विभागात एकाच दिवसात नवीन 203 कोरोनबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातील एकट्या पुणे जिल्ह्यातील एका दिवसातील रुग्णांची संख्या 200 आहे. त्यामुळे पुण्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळपर्यंत 268 करोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्हयात क्टीव रुग्ण 1 हजार 383 असून करोनाबाधीत 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

पुणे विभागात 1 हजार 905 बाधित रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 738 बाधीत रुग्ण असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 43 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 81 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 30 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 13 बाधीत रुग्ण आहेत. तर दिवसभरात करोना बाधित 5 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 हजार 905 वर जाऊन पोहचली आहे. तर मृत्यू 99 वर जाऊन पोहचले आहेत.

268 करोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्हयात क्टीव रुग्ण 1 हजार 383 असून करोनाबाधीत 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
दरम्यान, पुणे विभागातील 305 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात करोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 905 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 1 हजार 504 आहेत. विभागात करोनाबाधीत एकुण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 1 हजार 905 बाधित रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 738 बाधीत रुग्ण असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 43 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 81 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 30 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 13 बाधीत रुग्ण आहेत.

गुरुवार पर्यत विभागामध्ये एकूण 19 हजार 23 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 18 हजार 59 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 964 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 16 हजार 212 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून 1 हजार 905 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

Deshdoot
www.deshdoot.com