राज्यात कोरोनाचा सातवा बळी
Featured

राज्यात कोरोनाचा सातवा बळी

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – राज्यात कोरोनाने सातवा बळी घेतला आहे. मुंबईत एका 40 वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला. महिलेला कोरोनासदृश्य लक्षण आढळून आल्यानंतर शनिवारी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. त्यानंतर कोरोना तपासणीत महिलेला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.
मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाने 5 बळी घेतले आहेत. तर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून मुंबईत उपचारासाठी आलेल्यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com