Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात 27 वर्षीय तरुणासह चौघांचा कोरोनाने मृत्यू

पुण्यात 27 वर्षीय तरुणासह चौघांचा कोरोनाने मृत्यू

 सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – मंगळवारी दुपारपर्यंतच ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या चौघा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी चार जणांना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं पुण्यातील वातावरण चिंताजनक बनलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मृतांमध्ये तीन महिला आणि एका 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या चार मृत्युंमुळे पुणे शहरातील मृतांचा आकडा 34 तर जिल्ह्यातील आकडा 38 वर पोहचला आहे. दरम्यान, पुण्यातील ससुन रुग्णालयातील एका 34 वर्षीय नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. या नर्सचा कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आहे. अशी माहिती डॅा. अजय चंदवाले यांनी दिली.
आठवडाभरापासून कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मंगळवारी ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या चौघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी चार जणांना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं पुण्यातील वातावरण चिंताजनक बनलं आहे. काळजी करण्यासारखी बाब म्हणजे मृतांमध्ये तीन महिलांसह एका 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
ससून रुग्णालयामध्ये सोमवारी पाच कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर 10 रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आले होते. चार मृतांमध्ये पर्वती दर्शन येथील एक 27 वर्षीय तरूण आहे. त्याला 12 एप्रिलला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मद्यपानामुळे त्याचे यकृतचा आजार होता. तीन महिलांपैकी दोन कोंढव्यातील आहेत. एक 50 वर्षीय महिला असून तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. दुसर्‍या 42 वर्षीय महिलेला उच्च रक्तदाब, मधुमेह व अस्थमा होता. घोरपडी गावातील 77 वर्षीय महिला 2 एप्रिलला ससूनमध्ये दाखल झाली होती. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच मुत्रपिंडाचाही आजार होता. या चार मृत्यूमुळे ससूनमधील एकुण मृत्यूचा आकडा 29 वर पोहचला आहे. जिल्ह्यातील एकुण 38 मृत्यूपैकी पिंपरी चिंचवड, बारामती, अहमदनगर व ठाण्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. उर्वरीत 34 मृत्यू पुणे शहरातील आहेत.

- Advertisement -

शहरातील आणखी 22 भाग करणार सील
दरम्यान,शहराच्या मध्यभागातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोंढवा परिसरासह व सर्व पेठांचा परिसर सील केला. या ठिकाणी पोलिस आणि महापालिका प्रशासनाने कडक निर्बंध आणले आहेत. मात्र, त्यानंतरही ठराविक भागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता दुसर्‍या टप्यात आणखी 22 भाग सील करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यात पूर्व भागातील हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट व वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील बहुतांश परिसराचा समावेश आहे.महापालिका प्रशासनाने सील करण्यात येणार्‍या 22 भागांची यादी निश्‍चित केली आहे. यासंबधीचा प्रस्ताव आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पाठविला आहे. त्यावर आता जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त हे चर्चा करून एकत्रितरीत्या निर्णय घेणार असून, यासंबधीचे अंतिम आदेश जिल्हाधिकारी काढणार आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरातील आणखी 22 भाग पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही महापैरांनी केली.
दाट वस्तीमधील कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नव्याने 22 ठिकाणांमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे.

सील करण्यात येत असलेले भाग
1) पत्राचाळ, लेन नंबर 1 ते 48 आणि परिसर, प्रभाग क्रमांक 20
2) संपूर्ण ताडीवाला रोड
3) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर, प्रभाग क्रमांक 02
4) राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटर स्टँड, संत कबीर, Aएडी कॅम्प चौक, क्वार्टर गेट
5) विकासनगर, वानवडी गाव
6) लुम्बिनीनगर, ताडीवाला रोड
7) चिंतामणीनगर, हांडेवादी रोड
8) घोरपडी गाव, बीटी कवडे रोड
9) संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवाननगर, येरवडा प्रभाग 8
10) पर्वती दर्शन परिसर
11) जुने शिवाजीनगर बसस्थानक परिसर
12) पाटील इस्टेट परिसर
13) भोसलेवाडी, वाकडेवाडी
14) एनआयबीएम रोड
15) कोंढवा खुर्द
16) कोंढवा बुद्रुक
17) साईनगर, कोंढवा
18) विमाननगर
19) वडगाव शेरी
20) धानोरी
21) येरवडा
22) सय्यदनगर, महंमदवाडी, हडपसर

- Advertisment -

ताज्या बातम्या