Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात 30 माकडांवर होणार करोना लसीचा प्रयोग

पुण्यात 30 माकडांवर होणार करोना लसीचा प्रयोग

सार्वमत

पुणे – करोनाला रोखण्यासाठी डAठड उजत- 2 ही लस विकसित करण्यासाठी संशोधन सुरु आहे. संशोधनासाठी पुण्याची राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था 30 माकडांवर सर्वप्रथम प्रयोग करणार आहे. यासाठी 30 माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

- Advertisement -

सध्या राज्यात करोना विषाणुमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी 30 मे रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार ही माकडे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.

अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे, पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत न होऊ देणे, प्रकल्पाचा व्यापारी तत्वावर उपयोग न करणे आदी अटी शर्तींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली आहे अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या