पुण्यात करोनामुळे पोलीस दलातील दुसरा बळी

पुण्यात करोनामुळे पोलीस दलातील दुसरा बळी

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात गुरुवारी 43 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा करोनाच्या संसर्गानं मृत्यू झाला. पुणे पोलीस दलातील वाहतूक विभागात ते कार्यरत होते. पुणे पोलीस दलातील हा दुसरा बळी ठरला आहे. मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचार्‍यांचा काल करोनानं बळी घेतला असतानाच, आज पुणे पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे.

पुण्यात आज 43 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा करोनाच्या संसर्गानं मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली. पुणे पोलीस दलातील वाहतूक विभागात ते कार्यरत होते. 10 मे पासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.करोनाबाधित असलेले पोलीस कॉन्स्टेबल हे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

पुणे पोलीस दलातील किमान 26 कर्मचार्‍यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यातील 14 पोलीस बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पुणे पोलीस दलातील हा दुसरा बळी आहे. या महिन्याच्या सुरुवातीला 57 वर्षीय पोलीस अधिकार्‍याचा करोनामुळे मृत्यू झाला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com