देशात 24 तासांत करोनाचे नवे 1813 रुग्ण

देशात 24 तासांत करोनाचे नवे 1813 रुग्ण

सार्वमत

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 1813 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील करोनाबाधितांची संख्या 31 हजार 787 इतकी झाली आहे. करोनामुळे 24 तासात 71 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत भारतात करोनाची लागण होऊन 1008 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण एकूण मृत्यूपैकी महाराष्ट्रात तब्बल 400 करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत 7 हजार 797 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संकेतस्थळावरून बुधवारी ही माहिती दिली आहे.संसर्गग्रस्तांच्या एकूण मृत्यूसंख्येत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. देशातील 39.73 टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यात रूग्ण करोनामुक्तीचे प्रमाणही मंदावले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये करोना संसर्ग वेगाने वाढला. या राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 181 तर, मध्यप्रदेशात 120 रूग्णांचा करोना मुळे मृत्यू झाला.

दिलासादायक बाब म्हणजे देशातील करोनामुक्त होणार्‍या रूग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आतापर्यंत 7 हजार 695 रूग्णांनी करोनावर मात मिळवली आहे. महाराष्ट्रातील 1 हजार 388 रूग्ण संसर्गातून बरे झाले आहेत.महाराष्ट्रातील करोनामुक्त रूग्णांचे प्रमाण हे 14.89 टक्के आहे. गुजरातमध्ये 3 हजार 744, मध्यप्रदेशात 2 हजार 389, राजधानी दिल्लीत संसर्गग्रस्तांची संख्या 1 हजार 78 च्या घरात पोहचली आहे.

मेघालय तसेच मिझोरम मध्ये एकही करोनाग्रस्त नाही – देशातील काही राज्यांमध्ये करोनामुक्त रूग्णांचे प्रमाण हे 100 टक्क्यांच्या घरात आहे. ईशान्येकडील राज्यापैकी मेघालय तसेच मिझोरम मध्ये एकही करोनाग्रस्त नाही. आतापर्यंत गोवातील सर्व 7, अरूणाचल प्रदेशातील 1 तसेच मणिपूर 2 मध्ये रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. केंद्रशासित लद्दाख मध्ये 22 पैकी 16, तर पॉन्डेचेरीतील 8 पैकी 3 रूग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com