जिल्ह्यात पुढच्या काळात कोरोनाचा पादुर्भाव वाढण्याची शक्यता- जिल्हाधिकारी

jalgaon-digital
3 Min Read

जिल्ह्यात कारोनासाठी 21 हजार बेडची व्यवस्था ; जिल्ह्यातील सर्व सिमा सील, नागरिकांनी नियमांचे पालन करावे

चाळीसगाव  – 

जिल्ह्यात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नाही, परंतू तरी देखील आम्ही खबदारी म्हणून प्रशासनातर्फे तातडीने सर्व उपाय-योजना करीत आहोत. परंतू पुढच्या काळात जिल्ह्यात नागरिकांनी खबरदारी घेतली नाही, तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, घरातच राहुन स्वता;चा आणि दुसर्‍याला सुरक्षित ठेवावे असे आवाहन पत्रपरिषदेत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले.

तालुक्यातील पिलखोड, तरवाडेबारी, पारोळा आदिच्या ठिकाणच्या सिमांची पाहणी आज जिल्ह्याधिकारी व पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगळे यांनी सयुंक्तरित्या केली. त्यानतंर सायंकाळी शहरातील शासकिय विश्रामगृहात त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी प्रातांधिकारी लक्ष्मीकांत सातळकर, तहसीलदार अमोल मोरे, वैद्यकिय आधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर, उपविभागीय पोलीस आधिकारी कैलास गवाडे, पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड, पो.नि.प्रताप शिकारे आदि उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनासाठी 21 हजार बेडची व्यवस्था

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्त दोघांचा मृत्यू झाला आहे. परंतू कोरोना फारसा प्रादुर्भाव जिल्ह्यात नाही. भविष्यात जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी आम्ही आतापासून सर्व तालुक्यामध्ये खबदारीसाठी उपाय-योजना करुन ठेवल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तासाठी आम्ही 21 हजार बेडची व्यवस्था केली आहे. यात शासकिय रुग्णालयासह काही खाजगी रुग्णालय देखील आम्ही ताब्यात घेतले आहेत. तसेच भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे देखील नियोजन आम्ही करुन ठेवले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व सिमा सील

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता इतर जिल्ह्यातील नागरिक आपल्या जिल्ह्यात येवू नये, यासाठी आम्ही जवळपास जिल्ह्यातील सर्व मुख्य सिमा सील केल्या आहेत. तसेच गावपातळीवर ग्रामरक्षक दलामार्फत देखील आम्ही गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापन केल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. चाळीसगाव तालुका हा मालेगाव, धुळे , नाशिक व औरंगाबाद या जिल्ह्याच्या सिमांवर येत असल्यामुळे तालुक्याच्याही सर्व सिमा सील केल्या आहेत. मालेगाव कोरोनाग्रस्ताचे हॉटस्पॉट ठरत असल्यामुळे आज आम्ही तालुक्याच्या सीमांची पाहणी केली. तसेच दिवसरात्र काम करीत असलेल्या पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांची देखील भेट घेवून, त्यांचा उत्साह वाढविण्याचे प्रयत्न केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे म्हणाले.

कर्मचार्‍यांना सूचना

तालुक्यातील सीमा सिल करण्यात आल्या आहेत. परंतू यापुढे तालुक्यात येणार्‍या वाहनाची कडक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचाही आढवा घेतल्या आहे. जे नागरिक नियम्माचे उल्लघन करतील त्यांच्यावरही कडक कारवाईच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.

तालुक्यातील सेवा निवृत्त जवानाची सेवा कौतुकास्पद

तालुक्यातील गावाच्या पाहणी दरम्यान गावातील सेवानिवृत्त सैनिक हे स्वता;हुन ग्रामसुरक्षा दलात शामिल झाले आहेत. मालेगावहुन तालुक्यात येणार्‍या सर्व मुख्य सिमा सिल करण्यात आल्या आहेत. परंतू छुप्या मार्गावर ग्रामरक्षक दलातर्फे सुरक्षा ठेवली जात आहेत. यात सेवानिवृत्त जवानाची कार्य कौतुकास्पद असल्याची मा हिती यावेळी पोलीस आधिक्षक डॉ.पंजाबराव उगळे यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *