पुण्यात आतापर्यंत करोनाचे 303 बळी
Featured

पुण्यात आतापर्यंत करोनाचे 303 बळी

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) –  पुण्यामध्ये शुक्रवारी दिवसभरात 242 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर दिवसभरात 186 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आज पुण्यात 10 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील करोनाबाधित एकूण मृत्यूची संख्या 303 झाली आहे.

पुण्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 6093 इतकी झाली असून आजपर्यंतच एकूण 3450 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील अ‍ॅक्टिव रुग्ण संख्या सध्या 2340 इतकी आहे. 166 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून त्यात 45 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात आज 1179 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

दरम्यान, पुणे विभागातील 4 हजार 423 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात करोना बाधीत रुग्णांची संख्या 8 हजार 981 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 4 हजार 147 आहे. विभागात करोनाबाधीत एकुण 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 197 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 7 हजार 200 बाधीत रुग्ण असून करोना बाधित 3 हजार 848 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 3 हजार 37 आहे. करोनाबाधित एकूण 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 460 ने वाढ झाली आहे,

यामध्ये पुणे जिल्ह्यात 321, सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 100, कोल्हापूर जिल्ह्यात 9 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील 452 करोना बाधीत रुग्ण असून 134 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 301 आहे.करोनाबाधित एकूण 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 795 करोना बाधीत रुग्ण असून 314 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 409 आहे. करोना बाधित एकूण 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील करोना बाधीत 98 रुग्ण असून 54 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 41 आहे. करोना बाधित एकूण 3रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 436 करोना बाधीत रुग्ण असून 73 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 359 आहे. करोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याचा मृत्युदर देशात सर्वाधिक
पुण्यात मार्च महिन्यात राज्यातील पहिला करोनाचा रुग्ण आढळला आणि त्यानंतर सातत्याने रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडा वाढतोय. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 26 तारखेपर्यंत पुण्याचा मृत्युदर देशात सर्वाधिक आहे. राज्यापेक्षा पुण्याचा मृत्युदर 1.76 टक्के तर देशाच्या तुलनेत 2.15 टक्क्यांनी जास्त आहे. 26 मे रोजी पुण्याचा मृत्यूदर 5.03 टक्के महाराष्ट्राचा मृत्युदर 3.27 टक्के तर देशाचा मृत्युदर 2.88 टक्के इतका आहे.

देश (26  मे पर्यंतची आकडेवारी)
एकूण बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 50 हजार 793
बरे झालेले रुग्ण 64 हजार 277
उपचार घेत असलेले रुग्ण 82 हजार 161
तर मृत्यू 4344

महाराष्ट्र
राज्यात एकूण रुग्ण संख्या 54 हजार 758
बरे झालेले रुग्ण 16 हजार 954
उपचार घेत असलेले रुग्ण 36 हजार 12
मृत्यू 1792

पुणे
पुण्यात एकूण रुग्ण संख्या 5 हजार 427
बरे झालेले रुग्ण 2875
क्टिव रूग्ण 2279
मृत्यू 273

Deshdoot
www.deshdoot.com