मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील 16 जणांना कोरोना
Featured

मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील 16 जणांना कोरोना

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

ठाणे – गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये काम करणार्‍या 16 कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला. यामध्ये आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पाच पोलीस कर्मचारी, बंगल्यातील सहाय्यक, स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.एका वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान कोरोना बाधित पोलिसाच्या संपर्कात आल्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनमधील एका पोलिस अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांच्या संपर्कात गृहनिर्माण मंत्री आव्हाड आले होते. आव्हाडांनी स्वतःला राहत्या घरी क्वारंटाइन करून घेतले आहे. त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तरिही खबरदारी म्हणून त्यांना घरीच क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com