‘कुकीज’ वरील प्रेमाने दाखवला यशाचा मार्ग.!

‘कुकीज’ वरील प्रेमाने दाखवला यशाचा मार्ग.!

जर एखाद्या योजनेचे नियोजन योग्य रितीने केले नाही तर ती योजना यशस्वी ठरु शकत नाही, हे मला कळून चुकले.

माझा जन्म कॅलिफोर्नियातील ऑकलंडमध्ये झाला. माझे वडिल नौदालात वेल्डरचे काम करत होते. मला आठ बहिणी असून मी सर्वात लहान होते. वयाच्या १७ व्या वर्षी मी पदवी प्राप्त केली. माझी आई स्वयंपाक करण्यावरून नेहमीच वैतागलेली असायची. कारण ती चांगले जेवण तयार करत नव्हती. त्यामुळे मी जेवण करण्यास टाळाटाळ करायचे. भागविण्यासाठी केवळ कुकीज खात होते. कुकीज मला खूप आवडायच्या.

तत्पूर्वी वयाच्या तेराव्या वर्षी मी एका डिपार्टमेंटमध्ये काम केले आणि त्यावेळी पहिल्या पगारात चॉकलेट आणि व्हॅनिला खरेदी केले. एक दिवस मी आणि माझे पती एका ग्राहकाच्या घरी रात्री जेवणासाठी गेलो होतो. तेथे यजमानानी मला विचारले, की तुम्ही काय करता ? तेव्हा मी त्याला अडखळत उत्तर दिले. तो म्हणाला, की तुम्ही जर इंग्रजी चांगले बोलू शकता नसाल तर बोलू नका. यजमानाचे बोलणे ऐकूण निराश झाले.

त्याचवेळी मी ठरविले की काहीतरी व्हायला पाहिजे. जेव्हा मी आवडत्या कुकीजचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला घरच्यांनी वेड्यात काढले. कारण माझ्याकडे भांडवल नव्हते आणि व्यवसायाचा कोणताही अनुभव नव्हता. पण या मुदद्यावर मी दृढनिश्चियी बनले आणि व्यवसाय करण्याचे ठरवले.

व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रारंभीच्या काळात बँकेतून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी नकार दिला.
परंतु मी हार मानली नाही. १९७१ च्या दशकात २१ टक्के व्याजाने मला कर्ज मिळाले. कर्ज मंजूर झाल्याचे पाहून मला आनंद झाला. माझे उत्पादन आवडल्याने त्यांनी कर्ज दिले होतेच त्याचबरोबर माझा उत्साह कर्जदात्यांना अधिक भावला. जेव्हा मी व्यवसाय सुरू केला तेव्हा माझ्या पतीने माझ्यासमवेत एक स्पर्धा लावली. पहिल्या दिवशी ५० डॉलरची देखील विक्री होणार नाही, असे आव्हान दिले. मी ते आव्हान स्वीकारले आणि सकाळीच दुकानावर बसले. बराच काळ बसूनही ग्राहक फिरकला नाही. अशा स्थितीत मी स्पर्धा हारेल, अशी भीती वाटू लागली. मी वस्तू घेऊन रस्त्यावर उतरले आणि लोकांना कुकीजची चव घेण्याचे आवाहन केले. महतप्रयासाने त्यादिवशी ७५ डॉलरची विक्री करु शकली.

जर एखाद्या योजनेचे नियोजन रितीने केले नाही तर ती योजना यशस्वी ठरु शकत नाही, हे मला कळून चुकले. तेव्हा मी योजनेत बदल केला आणि चुका कळण्यासाठी लोकांची प्रतिक्रिया घेऊ लागली. एखादा पदार्थ कसा वाटला, याबाबत ग्राहकांचे मत जाणून घेऊ लागले. यासुनार मी बदल केला आणि पदार्थात सुधारणा होत गेली. याशिवाय मी दररोज खर्च आणि जमा याचा हिशोब ठेऊ लागले.

सुरवातीपासूनच मी ग्राहकांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला. ग्राहकांनी प्रतिसाद दिल्याने मला व्यवसायात यश मिळू लागले. अमेरिकेसह ११ देशात बेकरीचे ६५०हून अधिक दुकाने सुरू केली. १९९० च्या दशकात दशकात एका गुंतवणूक कंपनीला माझी कंपनी विकली. मात्र फिल्डस बेकरीच्या प्रमुख प्रवक्त्या म्हणून काम केले. याव्यतिरिक्त पाककलेवर असंख्य पुस्तकंदेखील लिहली.

– डेब्बी फिल्डस्‌

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com