Friday, April 26, 2024
Homeनगरयुवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस

युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस

इच्छुक वाढल्याने निवड समितीला करावी लागणार कसरत

अहमदनगर (प्रतिनिधी) –  प्रदेश युवक काँग्रेसच्या सूचनेनुसार नगर जिल्हाध्यक्ष पदासाठी तब्बल 16 इच्छुकांनी प्रत्यक्ष मुलाखत दिली असल्याने अध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. यामुळे आता युवक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यासाठी समितीला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून रिक्त असलेल्या, युवक काँग्रेसच्या नगर जिल्हाध्यक्ष पदाच्या मुलाखती पक्षाच्या लालटाकी येथील कार्यालयात गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. निरीक्षक म्हणून निवड समिती सदस्य व प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस सुमित भोसले, अभय देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पार पडल्या.

यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, जिल्हा युवक कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मयूर पाटोळे, मुबीन शेख, योगेश काळे, हारून इनामदार, फिरोज शेख, चंद्रकांत क्षीरसागर आदींनी त्यांचे स्वागत केले.

जिल्हाध्यक्षपदासाठी शरद निरंजन पवार (श्रीरामपूर), श्रीकांत दंडवते (राहाता), राजू बोरुडे (राहुरी), प्रसाद शेळके (शिर्डी), स्मितल वाबळे (श्रीगोंदा), ऋषिकेश मुळे (कर्जत), मोहसीन शेख (नगर शहर), संदीप दरंदले (नेवासा), राहुल उगले (जामखेड), सचिन रणदिवे (श्रीरामपूर) सिद्धेश खिलारी (पारनेर), मंगल भुजबळ (नगर शहर), कृष्णा शेळके (कर्जत), तुषार पोटे (कोपरगाव), संचित गिरमे (श्रीरामपूर), अ‍ॅड. अक्षय कुलट (नगर तालुका) यांच्यासह इतर दहा ते बारा इच्छुकांनी निरीक्षकांशी संपर्क करून इच्छा व्यक्त केली असल्याने अध्यक्ष निवडताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान निवड समिती सदस्य हे राज्याचे महमंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यांची भेट घेणार असून स्थानिक नेत्यांशी इच्छुकांबाबत चर्चा करून अध्यक्ष पदाबाबतचा सविस्तर अहवाल प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना सादर करणार असल्याने तूर्तास इच्छुकांची निवड प्रदेश कार्यालया मार्फत घोषित होईल असे निरीक्षक सुमित भोसले (सोलापूर) यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या