आदिवासी आश्रम शाळेतील सेविकेकडून लैंगिक छळाची तक्रार
Featured

आदिवासी आश्रम शाळेतील सेविकेकडून लैंगिक छळाची तक्रार

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक | प्रतिनिधी

आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत दिंडोरी तालुक्‍यातील करंजी येथील प्राथमिक आश्रम शाळेच्या एका शिक्षिकेने स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या सहकारी सेवकाविरोधात मानसिक व लैंगिक छळाची तक्रार दिली आहे.

दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे शालेय प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप या सेविकेने केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी अर्ज देऊनही कारवाई न केल्याने सदर सेविकेने वणी पोलिस ठाण्यात संबंधितां विरोधात फिर्याद दिली. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचे या सेविकेचे म्हणणे आहे.

याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे टपाली फिर्याद पाठवल्यानंतर दि. २८ फेब्रुवारी रोजी संशयित आनंदा ऊर्फ नंदू गोविंद पारधी, होस्टेल अधीक्षक टोपे, स्वयंपाकी सचिन हरिचंद्र व अमोल पिलोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्राथमिक आश्रम शाळेत यापूर्वी अनेकदा महिला सेविकांना कर्तव्याच्या ठिकाणी होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, धाक दडपशाईचा वापर करून ही प्रकरणे दाबण्यात आली.  संबंधित शाळेत विशाखा समिती नेमली याबाबतची माहिती नाही.

तसेच या समितीचा फलक शाळेमध्ये दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे आवश्यक असताना त्याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा या सेविकेने म्हटले आहे. सदर प्रकरणातील स्वयंपाकी कर्मचारी आनंदा उर्फ नंदू पारधी याने त्याच्या सहकाऱ्यांच्या नावाने पेट्रोल व ऍसिड हल्ला करण्याची धमकी दिली असल्याने संबंधित सेविका रजेवर आहे. माझ्या जीवितास धोका निर्माण झाला असून पारधी याला संरक्षण देण्यासाठी त्याला नियमबाह्य पद्धतीने शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनवले.

Deshdoot
www.deshdoot.com