Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशचीनमधून भारतात येणारी ‘ही’ कंपनी देणार 10 हजार रोजगार

चीनमधून भारतात येणारी ‘ही’ कंपनी देणार 10 हजार रोजगार

सार्वमत

नवी दिल्ली – चीनमधील मोबाईल उत्पादक लावा कंपनी पाठोपाठ पादत्राण क्षेत्रातील नामवंत ब्रॅण्ड म्हणून ओळख असलेल्या वॉन वेल्क्स कंपनीने चीनमधील आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून कंपनीचे मालक कासा एव्हर्ज यांनी भारतात उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ही कंपनी भारतात 110 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे 10 हजारांपेक्षा अधिक जणांना रोजगार मिळणार आहे.

- Advertisement -

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनमधून बाहेर पडून अन्य देशांमध्ये आपला व्यवसाय हलवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक मोबाईल कंपन्या आणि ईलेक्ट्रीक कंपोनंट तयार करणार्‍या कंपन्याही भारतात येण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी मूळ भारतीय असलेल्या लावा या कंपनीनं चीनमधून आपला व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता जर्मनीची बूट तयार करणारी कंपनी वॉन वेल्सनं आपला चीनमधील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच लवकरच ही कंपनी भारतात आपला प्रकल्प सुरू करणार आहे.

वॉन वेल्स ही कंपनी पुढील दोन वर्षांसाठी भारतात 110 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. तसंच आपल्या आग्रा येथील प्रकल्पातून दरवर्षी 30 लाख बूट तयार करण्यात येणार आहेत. ही कंपनी भारतात लॅक्टिक इंडस्ट्रिजसोबत एकत्र काम करणार आहे.
पहिल्या टप्प्यात ही कंपनी आग्रा येथे प्रकल्प उभारणार आहे. तर दुसर्‍या टप्प्यात एमसिलरी युनिट उभारण्याचं काम करण्यात येणार आहे. याद्वारे कंपनीला रॉ मटेरिअल देण्यात येणार आहे. तसंच या युनिटमध्ये बूटांसाठी सोल, स्पेशल फॅब्रिक आणि केमिकल तयार केलं जाणार आहे. वॉन वेल्स ही कंपनी जगभरात आपल्या फुटवेअर्ससाठी ओळखली जाते, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांकडून देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या