उत्तर पत्रिका दाखवली नाही म्हणून विद्यार्थ्यास चॉपरने मारहाण
Featured

उत्तर पत्रिका दाखवली नाही म्हणून विद्यार्थ्यास चॉपरने मारहाण

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – पेपर न दाखविने संतप्त झालेल्या आठ शालेय विद्यार्थ्यांनी साद शफीक शेख यास चॉपरच्या साह्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील श्रीमान गोकुलचंदजी विद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुलचंदजी विद्यालयात सध्या नववीच्या वर्गाच्या चाचणी परीक्षा सुरु आहे. काल या विद्यार्थ्यांचा पेपर होता. एका विद्यार्थ्यास साद शेख याने पेपर दाखविला नाही. यावर हा विद्यार्थी संतप्त झाला त्याने संपल्यावर आपल्या अन्य मित्रांच्या साथीने साद शेख याला चॉपरच्या साहाय्याने हल्ला केला. बाकीच्यांनी त्याला शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली. सात शेख हा जखमी झाला. त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्याच्यावर उपचार करून नंतर घरी सोडण्यात आले.

25याबाबत घटने बाबत कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गु.र.नं.33/2020भादंवि.कलम 324,323, 504, 506, 143,147,148,149 प्रमाणे दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com