Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedचोपडा : सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

चोपडा : सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

चोपडा  – 

माहेरी आलेली विवाहिता आपल्या सख्ख्या 2 भावडांना घेऊन तापी नदीवर धुणं धुण्यासाठी गेली असता विवाहितेचा डोहात पाय घसरून पाण्यात बुडाली तर यावेळी तिला वाचविण्यासाठी तिची सख्खी लहान बहीण गेली असता तिचा देखील डोहात पाय घसरून दोघा बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज 27 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास विटनेर (ता.चोपडा) येथे घडली. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

शिरपूर तालुक्यातील सुळ येथील रहिवासी असलेले प्रकाश बारेला हे विटनेर ता.चोपडा येथे सालगडी म्हणून शेतकर्‍याकडे कामाला आहेत.त्यांची मोठी मुलगी सौ.कविता राजाराम बारेला (वय-22)ही विवाहिता असून,अनवर्दे येथे रहाते दरम्यान आखाजी निमित्त ती माहेरी वडिलांकडे विटनेर येथे आलेली होती.

आज 27 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास विवाहिता सौ.कविता राजाराम बारेला ही लहान बहीण दीपाली प्रकाश बारेला (वय-14) व लहानभाऊ विक्की प्रकाश बारेला (वय-8) यांना घेऊन धुणं धुण्यासाठी तापी नदीवर गेली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या