राज्यातील कामगारांसाठी आरोग्य तपासणी व्हॅनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई :

बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, कंपनी मधील कामगार व इतर क्षेत्रातील संघटीत व असंघटित कामगार याकरिता वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे याकरिता एका डिजिटल चेकअप बसचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. ओम गगनगिरी हॉस्पिटल व ऑक्युपेशनल हेल्थ सर्विसेस सर्विसेस कोपरखैरणे यांची भारतातील ही तिसरी डिजिटल हेल्थ चेकअप बस आहे.

सदर डिजिटल बस महाराष्ट्रातील असंघटित कामगार माथाडी कामगार इमारत व इतर बांधकाम कामगार तसेच एसटी महामंडळातील कामगार यांच्या आरोग्य तपासणीसाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे.

सदर बसमध्ये अद्ययावत अशा डिजिटल एक्स-रे, डिजिटल ऑडिओ मेट्री डोळ्यांची तपासणी, बहिरेपणाची तपासणी फुफुसाची तपासणी व रक्ताच्या विविध तपासण्या करणारी उपकरणे असून कामगार काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तपासणी करणार आहे.

यावेळी परिवहनमंत्री अनिल परब आमदार तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील समनव्यक रवींद्र वायकर, डॉ. प्रकाश शेंडगे, ज्ञानराज चोंघुले आदी उपस्थित होते

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *