Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedचाळीसगावात पोलीसात तिघांवर गुन्हां दाखल

चाळीसगावात पोलीसात तिघांवर गुन्हां दाखल

चाळीसगाव  – 

चाळीसगाव येथे व्हॉट्अ‍ॅपच्या ‘ आमदार राजीवदादा ’ या गृपवरील सदस्यांनी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह संदेश टाकणे गृपअ‍ॅडमीसह सदस्याला चांगलेच महागात पडले आहे. या गृपवर संदेश प्रसारीत करण्याची अनुमती दिली म्हणून या गृपवरील दोन गृपअ‍ॅडमी व संदेश प्रसारीत करणार्‍या एक सदस्यावर चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहारात सोशल मिडीयावर संदेश प्रसारीत करणारे व गृपअ‍ॅडमीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना चाळीसगावात एक व्हॉट्सगृपवर आक्षेपार्ह मजुर टाकल्याची गुप्त माहिती मिळाली, त्या अनुषंगाने पोना.पंढरीनाथ पवार, गणेश पाटील यांनी आमदार राजीवदादा या व्हॉट्सअ‍ॅपगृपीची माहिती मिळवली असता, या हॉट्सअ‍ॅप गृपवर एकूण 119 सदस्य  असल्याची माहिती पोलिसांना मिळुन आली.

दि.3 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमरास कोरोना आपत्तीबाबत दुर्लक्ष करुन, तसेच दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल, या आशयचा आक्षेपार्ह संदेश आमदार राजीवदादा या गृपवरील 124 सदस्यांना पाठवल्याचे पोलिसांच्या निर्देशानास आले.

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला पोना.पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यादीवरुन गृपअ‍ॅडमीन विरोधात गृपवर संदेश प्रसारीत करण्याची अनुमती दिली.

तसेच गृप कुठल्याही प्रकारची देखरेख ठेवली नाही म्हणून, भादवी कलम 188,505(2) सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51(बी) तसेच 54 प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या