चाळीसगावात पीपीई किट रस्त्यावर फेकल्या
Featured

चाळीसगावात पीपीई किट रस्त्यावर फेकल्या

Balvant Gaikwad

ग्रामीण भागात वृध्दांच्या मृत्यूला कोरोनाची जोड

चाळीसगावात कोरोना शिरकाव केल्यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यातच शहरातील कोव्हींड केअर सेंटर जवळ असलेल्या बाप्पा पॉईंट जवळ रस्त्यावर दररोज अज्ञात व्यक्ती कोरोनाच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणारे पीपीई किट टाकूण जात असल्याने एकच खळबळ उडाली असून पीपीई किट उघड्यावर टाकणार्‍यावर गुन्हां दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच कोरोनाने शिरकाव केला  आहे. शहरालगत असलेल्या टाकळी प्र.चा.येथील एका पोलीस कर्मचार्‍याला कोरोनाची बांधा झाली आहे. तर सायगाव येथील एक जण नांदगावमध्ये कोरोना बांधित झाला आहे. तालुक्यातील जामडीची महिला देखील भडगांवमध्ये कोरोना बाधित झाली आहे. तर आतापर्यंत शहरातून जवळपास ४० ते ५० लोकांचे स्वॅब तपासणी पाठविण्यात आले होते. शहारसह ग्रामीण भागातील आतापार्यंत जवळपास २०० ते ३०० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचा एकच रुग्ण आढळुन आल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाग्रस्तांच्या प्राथमिक उपचारासाठी व क्वारंटाईन करण्यासाठी शहरात अंधशाळेतील मुलीच्या वस्तीगृहात कोव्हीड केअर सेंन्टरची स्थापना करण्यात आली आहे. त्यात कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याच संशयावरुन जवळपास १५ ते २० जण क्वारंटाईन आहेत. त्यातील क्वारंटाईन तालुक्यातील डोणच्या एक वृद्धाचा नुकताच अचानक मृत्यू झाला होता. या कोव्हीड केअर सेन्टरच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या (बाप्पा पॉईट) रस्त्यालगत गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोणी तरी अज्ञात व्यक्ती पीपीई किट उघड्यावरुन फेकून जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

याच परिसरात जवळपास पाच ते सहा मोठे हॉस्पीटल देखील आहेत. त्यामुळे हे पीपीई किट कोण उघड्यावर फेकते आहे, याचा शोध घेणे गरजेचचे आहे. वास्तवीक पाहता पीपीई किट जैवीक कचर्‍यामध्ये गनले जात असून त्याची विल्हेवाट योग्य पध्दतीन लावण्याची जबाबदारी वापर्‍यांवर व संबंधीत यंत्रेणवर आहे. परंतू शहरातील भर वस्तीत रस्त्यावर बेजबाबदारपणे आशापध्दतीन पीपीई किट फेकून लोकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ कोणी तरी खेळत आहे. त्यामुळे आता पीपीई किट फेकर्‍यांचा शोध घेवून, तसेच ते पीपीई कुठल्या रुग्णालयात वापर्‍यात आले, आशा संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी परिसरातील नागरिकांडून केली जात आहे. संबंधीतावर गुन्हां दाखल झाला, तरच शहरातील इतर ठिकाणी देखील जैवीक कचर्‍याची विल्हेवाट योग्य पध्दतीने यापुढे लावली जाईल.

ग्रामीण भागात वृध्दांच्या मृत्यूला कोरोनाची जोड

चाळीसगाव तालुका चहुबाजूने कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. त्यातच टाकळी प्र.चा.येथे एकाला कोरोनाचा लागन झाल्याचे उघड झाले आहे. तर आतापर्यंत तालुक्यातील दोघे दुसर्‍या तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर ग्रामीण भागात बाहेरगावाहुन आलेल्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाबाबत भयंकर भिती निर्माण झाली असून अफवाचा पेव देखील फुटला आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील गावांमध्ये एकाद्या वृध्दाचा वृध्दपकाळाने मृत्यू झाला, तरी कुठलीही चौकशी न करता कोरोना आजाराने मृत्यू झाल्याची अफवा मोठ्या प्रमाणात फसरविल्या जात आहे. यामुळे मृत पावलेल्या परिसरात लोकांच्या मनात भिती वाढत आहे. तसेच मृतांच्या परिवाराची देखील अहवेलना होत आहे. चुकीच्या अफवामुळे अनेकांना मानसीक तान निर्माण होता आहे. तालुका प्रशासाने सोशल मिडीयावर बंधने घालवी अशी देखील मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com