Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedपातोंडा येथे नऊ दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त

पातोंडा येथे नऊ दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त

पावणेदोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला नष्ट
तालुक्यातील पातोंडा शिवारात मुंदखेडा धरणाच्या काठी सुरू असलेल्या 9 गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर शहर पोलीसांनी आज सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेदरम्यान कारवाई केली. यात 1 लाख ४0 हजारांचे ४०० रुपयांचे रसायन नष्ट केले. असून 9 जणांविरोधात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या  कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असल्याने  प्रशासनाने संचारबंदीसह लॉकडाऊन केले आहे असे असतानाही पातोंडा शिवारात मुंदखेडा धरणाच्या काठी गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू असल्याची गोपनिय माहिती  आज पोलीसांना मिळाली.
यावरून पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोनि. मयुर भामरे,पोना. विनोद भोई, नितीन पाटील, संदीप पाटील, भटु पाटील, सतीष राजपूत, भूषण पाटील यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास पातोंडा शिवारात जाऊन मुंदखेडा धरणाच्या काठी सुरू असलेल्या सात गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करून दारू तयार करण्याचे 1 लाख ४० हजार ४०० रूपयांचे रसायन नष्ट केले.
याप्रकरणी आरोपी भोल्या साहेबराव सोनवणे, गोकुळ साहेबराव गायकवाड, भाईदास विष्णु पवार, रमेश सुरेश अहिरे, पांडूरंग गायकवाड, नाना निंबा वाघ, ज्ञानेश्वर पांडूरंग गायकवाड (सर्व रा. पातोंडा, ता. चाळीसगाव) यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या