शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डोंगरे
Featured

शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डोंगरे

Dhananjay Shinde

शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांची परभणी येथे जिल्हाधिकारी पदावर बदली झाली असून त्यांच्या जागी नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची बदली करण्यात आहे. अरुण डोंगरे हे लवकरच शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे स्विकारतील.

शिर्डी संस्थानचे कार्यकारी अधिकारी म्हणून राहिलेल्या रुबल गुप्ता यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर औरंगाबाद मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या आयुक्त म्हणून राहिलेले दीपक मुगळीकर यांनी 28 मार्च 2019 रोजी साई बाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारला होता. दीपक मुगळीकर यांनी आपल्या 11 महिन्यांच्या कार्यकाळात चांगले काम केले. तीन वर्षांचा कार्यकाळ शिर्डी साईबाबांच्या दरबारी जाईल असे वाटत असतानाच महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयाकडून त्यांच्या बदलीचे आदेश आले.

सुमारे तीन वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारणार्‍या अरूण डोंगरे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उपक्रम राबवले. जलयुक्त शिवार तसेच कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी केलेले प्रबोधन व वेगवेगळया सामाजिक उपक्रमासाठी मोठे सहकार्य केले. त्यांच्याच काळात जिल्ह्यात धान्य घोटाळा उघड झाला होता. अरुण डोंगरे यांनी वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे गेल्या तीन वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात आपल्या कार्याची छाप पाडली होती. नांदेड जिल्हाधिकारी म्हणून त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला होता त्यामुळे त्यांची कुठेतरी बदली होणार हे त्यांना माहित होते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा शिर्डी संस्थानला नक्कीच फायदा होऊ शकणार आहे. अरुण डोंगरे हे लवकरच दीपक मुगळीकर यांच्याकडून पदभार स्विकारणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com