Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकेंद्रीय आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल

केंद्रीय आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये तातडीने सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे तसेच आवश्यकतेनुसार क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना क्रेंदीय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त उपमहासंचालक डॉ. सुधीर गुप्ता यांनी सुक्रव्री केल्या. पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पुण्यात दाखल झाले आहे. त्यांनी विभैय आयुक्त आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून या सूचना केला.

- Advertisement -

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कोविड- 19 ची वाढती रुग्ण संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी करावयाचे नियोजन याबाबत आढावा बैठक घेऊन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहाय्यक उपमहासंचालक डॉ. मानस रॉय, वरिष्ठ क्षेत्रीय संचालक डॉ. अरविंद अलोणे उपस्थित होते.
डॉ. गुप्ता म्हणाले, केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करुन पुणे जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा व माहिती घेणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची रुग्णालये तसेच ससून, भारती हॉस्पिटल आदी कोरोनावर उपचार करणार्‍या रुग्णालयांना भेटी देवून पाहणी करणार आहोत. यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात वाढत असणार्‍या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

कॅन्टोनमेंट भागात दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन
कोरोना विषाणूच्या संसर्गाने पुण्यातील कॅन्टोनमेंट भागात (पुणे छावणी) चांगलंच थैमान घातलं आहे. या परिसरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन अखेर प्रशासनाने या ठिकाणी 2 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुणे कॅन्टोनमेंट हद्दीत 9 मे आणि 10 मे या दोन दिवशी पूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. कॅन्टोनमेंट बोर्डच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे छावणी हद्दीत आतापर्यंत 56 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत या ठिकाणी एका ज्येष्ठ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच 6 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या एकूण 49 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कॅन्टोनमेंट परिसरात मोदीखाना परिसर, घोरपुरी, फातिमानगर, सोलापूर बाजार, दस्तुर मेहेर रोड आणि भीमपुरा या भागात लॉकडाऊन करण्यात येईल. त्यामुळे या परिसरात फक्त मेडिकल दुकानं सुरु राहतील. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे
पुणे मनपानं कंटेनमेंट भाग वगळता इतर भागातील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे शहरातील साधारण 97 टक्के भाग खुला झालाय. अशा परिस्थितीत पुणे कॅन्टोनमेट बोर्डानं खबरदारीचा उपाय म्हणून कॅन्टोनमेंट हद्दीत 2 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत इथं फक्त मेडिकल दुकान सुरु राहतील. त्यामुळं दूध, भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही बंद राहतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या