सीबीएसई : दहावी-बारावीच्या परीक्षा 1 जुलैपासून
Featured

सीबीएसई : दहावी-बारावीच्या परीक्षा 1 जुलैपासून

Dhananjay Shinde

सार्वमत

नवी दिल्ली –  सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वीच्या ज्या परीक्षा लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्या परीक्षा आता 1 ते 15 जुलै या कालावधीत होणार आहेत अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. ट्विटवर एक व्हिडीओ ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.मात्र अद्याप परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर केले जाणार नाही, असे सीबीएसई परीक्षा नियंत्रकांनी म्हटले आहे.

सीबीएसई बोर्ड 10 आणि 12 वीच्या उर्वरित परीक्षा घेणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आलेहोते. त्यानुसार आता ही घोषणा करण्यात आली आहे. मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकाडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार आहेत. यासह मंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, दहावीच्या परीक्षा फक्त उत्तर-पूर्व दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठीच असतील.

Deshdoot
www.deshdoot.com