Wednesday, April 24, 2024
Homeशैक्षणिकबायोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये करियर करताना…

बायोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये करियर करताना…

जैविक जीव आणि अणुशी संबंधित अभ्यास बायोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये केला जातो. त्याचबरोबर रचना आणि उत्पादनाशी निगडीत गोष्टींचाही बायोकेमिकलमध्ये अभ्यास होतो. करियरच्या दृष्टीने बायोकेमिकल इंजिनिअरिंग क्षेत्र उपयुक्त क्षेत्र मानले जात असून तेथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. बायोकेमिकल इंजिनिअरिंग, रासायनिक इंजिनिअरिंग (केमिकल इंजनिअरिंग) हा जैव रसायन आणि मायक्रोबायलॉजीतील अंतर्गत विषय अभ्यास आहे. त्याचा प्रमुख उद्देश हा बायो टेक्नॉलॉजी, बायो केमिकल इंजिनिअरिंग, मायक्रोबियल आणि एंजाइम सिस्टिममध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे होय.

बायोकेमिकल्स इंजिनिअरिंगचे विषय – बायोकेमिकल्स इंजिनिअरिंगमध्ये अनेक विषयांचा अभ्यास केला जातो. त्यात बायोकेमिस्ट्री, बायो इंटरप्रेन्योरशिप, ऑर्गेनिक केमिस्ट्री, पॉलिमर इंडस्ट्री, बायोप्रोसेस, बायोप्सी, एन्वायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी, एन्वायरमेंटल स्टडी, फर्टिलाजयर टेक्नॉलॉजी याशिवाय अन्य काही महत्त्वाच्या विषयाचा बायोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये समावेश होतो. या विषयाची माहिती आपण इंटरनेटवर घेऊ शकता.

- Advertisement -

पदवी अभ्यासक्रमासाठी पात्रता – पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला फिजिक्स, मॅथ, केमिस्ट्री, बायोलॉजी विषयासह बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे गरजेचे आहे.अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. यासाठी परीक्षा दोन भागात विभागली जाते. एका भागात वैकल्पिक प्रश्न विचारले जातात. त्याचा कालावधी हा तीन तासाचा असतो. तर दुसर्‍या भागात तीन खंडात विभागणी केलेली असते. केमिस्ट्री, मॅथ आणि फिजिक्समध्ये भाग केलेले असतात.

पदव्युत्तर पदवीसाठी परीक्षा –  पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी आपल्याकडे बायोकेमिकल इंजिनिअरिंगची पदवी किंवा बीटेक पदवी असणे गरजेचे आहे. तसेच पीजी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षेत चांगले गुण असणे देखील गरजेचे आहे. त्यानंतर आपल्याला पोस्ट ग्रॅज्यूएशन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. प्रवेश परीक्षेचे आयोजन केंद्र, राज्य आणि खासगी महाविद्यालयांकडूनही केले जाते. या परीक्षेत बीटेकच्या अभ्यासक्रमातूनच प्रश्न विचारले जातात.

बायोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्यूएशन अभ्यासक्रम हे देशातील अनेक नामवंत विद्यापीठाकडून शिकवले जातात. याशिवाय खासगी शैक्षणिक संस्थांकडूनही पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. तेथे आपण प्रवेश घेऊन करियरला दिशा देऊ शकतो. बायोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम कोणत्या ठिकाणी शिकवले जातात यासाठी आपण इंटरनेटची मदत घेऊ शकता. या आधारे शैक्षणिक संस्थांचा शोध घेता येईल.

प्रमुख परीक्षा

ऑल इंडिया इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा

भारत यूनिर्व्हर्सिटी इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा

बायोटेक कंन्सोर्टियम इंडिया लिमीटेड कॉमन प्रवेश परीक्षा

इंजिनिअरिंग, अ‍ॅग्रीकल्चर अँड मेडिकल कॉम प्रवेश परीक्षा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जॉइंट प्रवेश परीक्षा (आयआयटी-जेईई)

जाधवपूर यूनिव्हर्सिटी बायोमेडिकल इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा

संत लोंगोंवाल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्रवेश परीक्षा

व्हीआयटी इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा

- Advertisment -

ताज्या बातम्या