हवामानतज्ञ व्हा !
Featured

हवामानतज्ञ व्हा !

Sarvmat Digital

चेन्नई असो किंवा मध्यपूर्व भागातील महापूर असो, हिमवृष्टीमुळे आच्छादलेले काश्मीर असो की ढासळत्या पर्यावरणाचे पृथ्वीवर होणारे दुष्पपरिणाम असो या सर्व गोष्टीकडे आणि घटनांकडे सामान्य व्यक्ती चिंतेच्या दृष्टीने पाहत असतो त्याचवेळी हवामानतज्ञ हा वातावरणातील बदलत्या घटनांना आव्हान म्हणून पाहत असतो. हवामानतज्ञ, पयार्वरणतज्ञ हे केवळ हवामानाचा अभ्यास करत नाही तर त्याची कारणे, परिणामाचाही शोध घेत असतात. ही मंडळी पर्यावरण आणि हवामानावर परिणाम करणार्या घटकांचे अध्ययन करत असतात. एक क्लायमेटोलॉजिस्ट हा पृथ्वीच्या गर्भात उपलब्ध पाणी आणि तेथील तापमानापासून ते वातावरण आणि आर्द्रतेचा अभ्यास करत असतात.

ते काय करतात :
पर्यावरणतज्ञ, हवामानतज्ञ हे माती परीक्षण करुन कोणत्या ठिकाणी किती पाणी आहे तसेच तेथील वातावरण आणि भविष्यातील पर्यावरणाच्या स्थितीचे आकलन करत असतात. अनेक वर्षांपासूनच्या आकडेवारीच्या आधारावर हवामानतज्ञ कमाल आणि किमान तापमान, सुर्योदय, सुर्यास्त, पाऊस, वार्याची दिशा याचीं नोंद करतात आणि संभाव्य बदलाची सूचना देतात. भूकंपानंतर समुद्रात सुनामी येणार की नाही, याची पूर्वसूचना देऊन नागरिकांना सजग करत असतात.हवामानतज्ञांच्या सल्ल्यानुसार भूकंपप्रवण किंवा नैसर्गिक आपत्तीची सतत टांगती तलवार असणार्या भागातील घराची रचना केली जाते. एवढेच नाही तर हीटिंग आणि कुलिंग सिस्टीम, ड्रेनज सिस्टिम, घनकचरा व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी हवामानतज्ञांचा सल्ला घेतला जातो. कोणत्याही ठिकाणची पाणी पातळी, पावसाची सरासरी, संभाव्य बदल आदींच्या आधारावर पिकांची स्थिती कशी राहिल हे सांगण्यासाठी हवामानतज्ञ उपयुक्त ठरतात. या शास्त्रज्ञांचे डोळे, नाक आणि कान हे उपकरणे असून त्यात रेन गॉज, अनिमोमीटर, थर्मोमीटर, बॅरोमीटर, रेडिओसोनेसडस, रिमोट सेन्सिंग उपकरण, आर्द्रता, हवेचा वेग, गुणवत्ता आदी उपकरणांपासून अंतराळात सोडण्यात येणार्या उपग्रहातील संवेदनशील उपकरण याचा समावेश असतो.

विज्ञान आणि गणिताची पार्श्वभूमी हवी :
मेटिरोलॉजिस्ट आणि क्लायमेटोलॉजिस्टच्या रुपाने करियर करायचे झाल्यास 10+2 च्या स्तरावर विज्ञान आणि गणित विषय असणे गरजेचे आहे. वातावरणतज्ञ (अ‍ॅटमॉस्फिरिट सायन्स) हा कोणत्याही स्ट्रिममध्ये पदवी प्राप्त करून बीटेक करुन त्यानंतर क्लायमेटोलॉजीमध्ये एम.टेक करु शकतो.

हवामानतज्ञ : विषय आणि भविष्य
हवामान शास्त्राच्या अभ्यासक्रमात अनेक विषयांचा समावेश असतो. त्यात जिओलॉजी, अ‍ॅस्ट्रोलॉजी, अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स, मेटिरोयोलॉजी, अ‍ॅस्ट्रानॉमी, मॅथेमेटिक्स, फिजिक्स आदी विषयांचा समावेश असतो. क्लायमेटोलॉजी हे वैशिष्ट्येपूर्ण क्षेत्र आहे आणि या कारणामुळेच कंपन्यात संशोधन संस्था, सरकारी संस्था, आयपीसीसी, यूएनपी यासारखे पर्यावरणाशी निगडीत जागतिक संघटनांचा समावेश होतो. एका पर्यावरणतज्ञाला रोजगाराच्या संधी विपूल आहेत. हवामानाचा दररोज अंदाज सांगण्यासाठी इंडियन मेटिरोलॉजी डिपार्टमेंट, अ‍ॅटमॉस्फेरिक संशोधन संस्था, न्यूज ब्रॉडकास्टिंग, कृषी संशोधन संस्था, नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी, इस्रो, स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर आदी ठिकाणी जॉब मिळतो. सर्व विमानतळावर हवामानविषयाशी निगडीत विभाग असतो. विमानांचे उड्डाण सुरळीत व्हावे यासाठी हवामानाचा अंदाज घेतला जातो. म्हणून तेथे मेटोरॉलाजिस्ट किंवा क्लायमेटोलॉजिस्टची नियुक्ती केली जाते. याशिवाय हवामानतज्ञ किंवा वातावरणतज्ञ हा दुर्गम भागात, पर्वतीय भागात किंवा भूकंपप्रवण भागात इमारतीसाठी आर्किटेक्चर म्हणूनही उपयुक्त ठरतो. तो घरांची आखणी, पुलाची तसेच उड्डाणपुलाची रचना, रस्ता आणि त्याचा आकार, स्थिरता याबाबतही हवामान शास्त्रज्ञ सल्ला देतात. आजकाल समुद्राचे वाढते तापमान हा अभ्यासाचा मोठा विषय ठरला आहे. यात हवामानतज्ञ, शास्त्रज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतो. सरकारी क्षेत्रात यासंबंधी निगडीत पदांवर नियुक्तीसाठी एसएससी, यूपीएससी, पीसीएसच्या माध्यमातून वेळोवेळी अर्ज मागविले जातात.

तीन महत्त्वाचे मुद्दे:
प्रत्यक्षात हे करियर संशोधनावर भर देणारे आहे. आव्हानत्मक असल्याने यात आवड असणे गरजेचे आहे. त्यामुळे केवळ विज्ञानात रुची असून चालत नाही तर वातावरण, पर्यावरणाचा अभ्यास करण्याची देखील आवड असणे महत्त्वाचे ठरते.

या क्षेत्रात सांख्यिकी आकडेवारी, क्लायमेट मॉडेल्स, तसेच कॉम्प्यूटरचे अत्यंत संवेदनशील सॉफ्टवेअर व अ‍ॅप्लिकेशनबरोबर काम करावे लागते.

वातावरण क्षेत्रातील आव्हाने पाहता पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्याबरोबरच पुरेसा अनुभव असणे देखील तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच कोणताही हवामानतज्ञ किंवा वातावरण तज्ञ असो तो स्वत:चे मत मांडत नाही. तो नेहमीच आकडेवारीच्या आधारावर भविष्यवाणी करत असतो

Deshdoot
www.deshdoot.com