Friday, April 26, 2024
Homeशैक्षणिकसंगणकाधारित करिअर क्षेत्रे

संगणकाधारित करिअर क्षेत्रे

आयटी सेक्टरमध्ये करियर करु इच्छिणार्‍या विद्यार्थ्याला बारावीत गणीत विषयासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. माहिती आणि तंत्रज्ञान तसेच संगणक क्षेत्रात अन्य क्षेत्राच्या तुलनेने अधिक संधी मिळत आहे. सध्याच्या काळात संगणकांचे लहान सहान अभ्यासक्रम देखील उपयुक्त ठरत आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानातंर्गतील संगणकांची तांत्रिक माहिती आणि तंत्र हे रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करुन देत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानात करियर करु इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयात चांगले गुण मिळणे गरजेचे आहे.

संगणकावर आधारितकाही प्रमुख करियर कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंग :
कॉम्प्यूटर सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंगला विशेष महत्त्व आहे. हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. या आधारावरच तंत्रज्ञानाचे ज्ञान जीवंत आहे. कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंग हा एकप्रकारचा कोडिंग प्रोग्रँम आहे. कोणताही प्रोग्रँम तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या संगणकीय भाषांचा प्रयोग केला जातो. कोडिंग माध्यमातून कॉम्प्यूटर प्रोग्रँम तयार करण्याच्या पद्धतीलाच कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंग असे म्हटले जाते. विशेष म्हणजे कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंगच्या सुरवातीला असेंब्ली, सी. जावा, स्क्रिप्ट, ऑरेकल, डॉस आदी भाषांची माहिती दिली जाते. कोणताही प्रोग्रॅम तयार करताना या भाषेला विशेष महत्त्व आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना फ्रंटएंड तसेच बँकएंड म्हणजेच स्टोरेजच्या पद्धतीचे देखील आकलन केले जाते. ङ्ग्रंटएंड हे प्रोग्रॅम मॉनिटर स्क्रिनवर विंडोजप्रमाणे चालवले जाते. तर बॅकएंड प्रोग्रॅम केवळ बोर्डच्या माध्यमातून संचलित केले जाते. कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी दोन प्रकारचा अभ्यास करावा लागेल. पहिले म्हणजे तांत्रिक पदवी प्राप्त करणे आणि दुसरे म्हणजे कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंगमध्ये डिप्लोमा करणे. कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या विपूल संधी आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना बेरोजगार म्हणून शकत नाहीत. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कॉम्प्यूटर प्रोग्रॅमर, कम्यूटर टिचर, प्राध्यापक, सॉफ्टवेअर इंजिनिअर आदी होऊ शकतात. तसेच ते स्वत:चे सायबर कॅफे आणि कोचिग सेंटरही सुरू करु शकतात. ते आऊटसोर्सिंग करुन आपली सेवा प्रदान करु शकतात.

- Advertisement -

नेटवर्किंग इंजिनिअरिंग :                                                                                                                                            सध्याच्या काळात संगणकाचा उपयोग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजच्या काळात संगणक हा आपला अभिन्न अंग बनला आहे. बँक, रेल्वे, विमा आणि अन्य शासकीय अशासकीय तसेच खासगी उपक्रमात संगणकाचा वापर अनिवार्य झाला आहे. म्हणूनच कॉम्प्यूटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. संगणक क्षेत्रातील क्रांतीमुळे जसे की इंटरनेट, मोबाईल ङ्गोन, एटीएम, कॉल सेंटर आदी कारणांमुळे कॉम्प्यूटरच्या अनेक महत्त्वपूर्ण भागांची सुधारणा करण्यासाठी कौशल्यप्राप्त कॉम्प्यूटर हॉर्डवेअर इंजिनिअरची गरज नेहमीच भासते. हार्डवेअर आणि नेटवर्किंग इंजिनिअरिंग क्षेत्रात रोजगारांच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रात रोजगारासाठी इच्छुक विद्यार्थी कॉम्प्यूटर हार्डवेअर रिपयेरिंग आणि नेटवर्किंग क्षेत्राची निवड करु शकतात.

मल्टीमीडिया :                                                                                                                                                          मल्टीमीडिया हे एक बहुआयमी तंत्रज्ञान आहे. या आधारावर दळणवळणाचे विविध माध्यम जसे की ऑडिओ, व्हीडिओ, टेक्स्ट, ग्राफिक्स, अ‍ॅनिमेशन, कलर्स आदींचा वापर कॉम्प्यूटरच्या माध्यमातून एकाचवेळी केला जातो. आज अ‍ॅनिमेशन आधारित द जंगलबुक सारख्या हिट चित्रपटांचा बोलबाला आहे. मोबाईल गेमिंगमध्ये मल्टीमीडियाने धुमाकूळ घातला आहे. या क्षेत्रातील रचनात्मक विचार बाळगणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगाराची विपूल संधी आहे. दहावीनंतर मल्टीमीडियाचा अभ्यासक्रम करता येऊ शकतो. याशिवाय कॉल सेंटर आणि आऊटसोर्सिंग, स्टॉक मार्केटमध्ये संगणकाचा वापर, देश विदेशातील भाषांचे अनुवादक, मेलिंग सर्व्हिस, टॅक्स रिटर्न सेवा, बुक इंडेक्सिंग , डेक्सटॉप पब्लिशिंग, प्रोग्रॅम/पॅकेजिंग डिस्ट्रिब्युटर, कॉम्प्यूटरने सल्ला देणे, डेटा एंट्री सेवा, कॉम्प्यूटर कौन्सिलिंग, इलेक्ट्रॉनिकशी निगडीत बुककिंपिंग सर्व्हिस, कॉम्प्यूटरवर भविष्यवाणी, ब्रोशर्श तयार करणे, आदी सेवासाठी संगणकाचा वापर केला जात आहे.

रोजगाराच्या संधी :
राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या देश विदेशातील संस्थेंत कॉम्प्यूटर तज्ञांना नेहमीच मागणी राहिली आहे.शाळा आणि कॉलेजमध्ये देखील अध्यापक म्हणूनही चांगली संधी उपलब्ध होत आहे. भारतीय लष्करातही अधिकारी होण्याची इच्छा असेल तरीही संधी विपूल आहेत.

कॉम्प्यूटरची कोणतीही भाषा शिकण्यासाठी एमएस ऑफिस, इंटरनेट, इ मेल, कॉम्प्यूटरशी निगडीत सिद्धांत आदी संगणकाची बेसिक माहिती घेणे गरजेचे आहे. सर्वात अगोदर बेसिक अ‍ॅप्लिकेशनचे ज्ञान भरपूर असणे गरजेचे आहे. प्रोग्रॅम तयार करताना त्याचे कोड, संकलन, दस्तावेज तयार करणे, एकीकरण, देखभाल गरजांचे विश्‍लेषण, सॉफ्टवेअर, वास्तुकला, सॉफ्टवेअर परीक्षण करता येणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या