यावल-गिरडगाव : आग लागून कडबा कुट्टी जळून खाक ; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
Featured

यावल-गिरडगाव : आग लागून कडबा कुट्टी जळून खाक ; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Rajendra Patil

यावल – प्रतिनिधी

आज दि.25 एप्रिल 2020 रोजी गिरडगाव येथील शेतकरी युवराज बडगु पाटील यांच्या शेतातील जवळपास बाराशे ते पंधराशे कडव्याची कुट्टी केलेली जळून खाक झाली संबंधित शेतकऱ्यांनी पोलीस पाटील अशोक पाटील यांना फोन करून बोलून कोणीतरी अज्ञात इसमाने आमचे कुट्टी जाडली असल्याचा संशय व्यक्त केला.

सदर ठिकाणी जाऊन बघितले असता कुठे पूर्णपणे जळून खाक झालेली होती. सुरुवातीला आग विझवण्याच्या कामी युवराज पाटील व त्यांचे मुलं संदीप पाटील दीपक पाटील व त्यांचा पुतण्या समाधान भागवत पाटील यांनी विझवण्याचा प्रयत्न केला असता दुपारी खूप हवा व ऊन असल्यामुळे त्यांना त्यात यश आलं नाही घडलेल्या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com