पाचोरा : करोना बाधीत आयसोलेट केलेल्या रूग्णाच्या घरी चोरी ; रोकड लंपास
Featured

पाचोरा : करोना बाधीत आयसोलेट केलेल्या रूग्णाच्या घरी चोरी ; रोकड लंपास

Rajendra Patil

पाचोरा- प्रतिनिधी
पाचोऱ्यातील एका कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील आयसोलेट केलेल्या व्यक्तीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधत सिंधी कॉलोनी भागातातील गजानन नगरात एका घरात चोरांनी डल्ला मारला आहे.

चोरट्यांनी सोने-चांदीचा ऐवज चोरून न नेता तीन ते चार हजाराची रोकड लंपास केल्याची माहिती मालक रमू पंजाबी यांनी दिली. घटनास्थळी पोलीस उप निरिक्षक गणेश चौबे, पो,.कॉ. राहुल बेहरे, नितीन सुर्यवंशी, किशोर पाटील आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक पंचनामा केला.

Deshdoot
www.deshdoot.com