यावल : निखिल पाटील ऑस्ट्रेलीया सिडनी येथे एक मार्चला रवाना होणार
Featured

यावल : निखिल पाटील ऑस्ट्रेलीया सिडनी येथे एक मार्चला रवाना होणार

Rajendra Patil

यावल (प्रतिनिधी) –

निखिल राम कृष्ण पाटील M S साठी ऑस्टे्लीया सिडनीसाठी दि.१ मार्च २०२० ला रवाना होत आहेत. निखिलने बालवाडी ते चवथी पर्यंतचे शिक्षण मामांकडे अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे घेतले. नंतर पाचवी ते दहावी आर.आर.विद्यालय जळगाव ११ वी १२ वी मु जे कॉलेज जळगाव नंतर इंजिनिअरिंग साठी आर.एम.डी. कॉलेज सिंहगड पूणे येथे शिक्षण घेतले.

घरची परीस्थिती हलाखीची असल्याने त्यातच कँम्पज निवड झाल्याने १८ महिन्याच्या करारावर खाजगी कंपनीत नोकरी जॉईंट केली नंतर करार संपल्यावर दुसऱ्या कंपनीत नोकरी साठी अर्ज केले. त्यात खूप त्रास सहन केला कंपन्यान वाले खूप काही माहिती मागत होते शेवटी M S करायचे ठरवून परिक्षा दिली व पास झाल्याने सिडनी विद्यापीठात प्रवेश मिळविला.

ते आता येत्या १ मार्च २०२० रोजी सिडनी ऑस्ट्रेलिया साठी रवाना होत आहे मोठा भाऊ स्वप्निल देखिल पुण्यात नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून सिनीयर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करीत असून बहिण भावना M. A. B. Ed. D. Ed होवून पोदार कॉलेज पूणे येथे नोकरी करीत आहे.
वडील रामकृष्ण पाटील पोलीस विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून MIDC पोलीस स्टेशन जळगाव येथे नोकरी करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com