बबिता पटेल यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार जाहीर
Featured

बबिता पटेल यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार जाहीर

Rajendra Patil

शेळावे, ता.पारोळा – वार्ताहर

येथून जवळ असलेले आदर्श गाव राजवड (ता.पारोळा) गजानन माध्यमिक विदयालयाच्या उपक्रमशील व आदर्श युवा शिक्षिका बबिता पटेल यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला असुन संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशणात राज्यभरातील ८० उपक्रमशील शिक्षकांचा गौरव होणार आहे.

राज्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते बबिता पटेल यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ह्या शैक्षणिक वर्षात आपल्या कार्याने विविध उपक्रमशीलतेने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारांची त्यांनी हॅटट्रीक केली आहे हे विशेष.

Deshdoot
www.deshdoot.com