यावल : अंजाळे गावाजवळ एस.टी.बसला अपघात ; पाच प्रवासी जखमी, एक गंभीर

यावल : अंजाळे गावाजवळ एस.टी.बसला अपघात ; पाच प्रवासी जखमी, एक गंभीर

जळगाव : यावल  प्रतिनिधी –
आज दि.6 फेब्रुवारी 20 रोजी सकाळी ०९:२० वा. यावल-भुसावळ महामार्गावरील अंजाळे गावचे हद्दीतील घाटाचे धोकादायक वळणावर भुसावळ कडून यावलकडे हिंगोणा गावी जाणारी एस.टी.बस क्र.MH-14-BT-0442 ने घाटातून उतरताना समोरील ट्रक क्र.GJ-X-5862 ला मागून धडक दिल्याने सदर अपघातात एकुण ५ प्रवासी जखमी, त्यात एक गंभीर जखमी झाला आहे.

घटनास्थळी यावल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व सहकाऱ्यांनी तात्काळ जाऊन जखमींना औषधोपचारासाठी भुसावळ येथे दवाखान्यात हलवले अपघात ग्रस्त एस.टी.ला क्रेनच्या सहाय्याने बाजुला करून वाहतुक पुर्ववत केली आहे.

त्याठिकाणी एक किलोमीटरवर रहदारी थांबली होती घाट सरळ करण्याचे रस्त्याचे काम व पुलाचे काम प्रगतिपथावर आहे याठिकाणी झालेल्या अपघातातील घटना समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली व अपघातग्रस्त एसटीतील प्रवाशांना धीर दिला याबाबत यावल पोलीस स्टेशनला

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com