जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून दोन अर्ज
Featured

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून दोन अर्ज

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून दोन अर्ज खरेदी

जळगाव –

जिल्हयाचे मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परीषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठीच्या प्रकियेला आज शुक्रवार सकाळी ११ वाजता सुरूवात करण्यात आली. सकाळी ११.४५ वाजेपर्यंत महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी जयश्री अनिल पाटील यांचेसह रेखा दिपकसिंग राजपूत या दोन जणांनी, तर उपाध्यक्षपदासाठी मनोहर गिरधर पाटील व नानाभाउ महाजन असे प्रत्येकी दोन जणांनी नामांकन अर्ज खरेदी केले आहेत.

दुपारी १२ वाजेपर्यंत भाजपाकडून एकाही सदस्याने उमेदवारी अर्ज खरेदी केलेला नाही. आज दुपारी ३ वाजेपर्यत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अंतिम निवड घोषित होण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-खडसे जैन हिल्सवर

दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचेसोबत न्याहरी करून माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि माजी मंत्री, आमदार गिरीष महाजन हे जैन हिल्स वरून एकाच वाहनातून कोल्हे हिल्सकडे रवाना झाले. भाजपाचे सर्व जिल्हा परीषद सदस्य कोल्हे हिल्सला मुक्कामी असून जिल्हा परीषदेत जाण्यापूर्वी खडसे व महाजन हे सर्व सदस्यांशी चर्चा करणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com