जळगाव : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत २० जानेवारीला जिल्हा नियोजनची आढावा बैठक
Featured

जळगाव : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत २० जानेवारीला जिल्हा नियोजनची आढावा बैठक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जिल्हा परीषदेच्या अखर्चित निधीसह विविध विषय गाजणार

जळगाव – 

विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणूका होऊन स्थापन झालेल्या नव्या राज्य सरकारच्या पंचवार्षिक कालावधीतील जिल्हा नियोजन समितीची पहिली आढावा बैठक नवनियुक्त पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.२० जानेवारी २०२० रोजी दु.१.वा. जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पवार यांनी दिली.

या बैठकीत जिल्हा परीषदेच्या अखर्चित निधीसह विविध विषयांसह गत काळात अखर्चित निधींसह प्रलंबीत विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com