जळगाव : अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तरुणास अटक
Featured

जळगाव : अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तरुणास अटक

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदी पात्रातून वाळूची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याबाबत पोलिसांनी आरोपीस अटक केली. ही कारवाई आव्हाणे येथील तलाठी मनोहर शिवराम बाविस्कर यांच्या पथकाने १३ रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास आव्हाणे येथील नदीजवळ घडली.

तलाठ्यांचे पथक नदी पात्रात पोहचले असता तेथे अरविंद उर्फ अर्जुन ताराचंद मोरे (वय २३) हा तरुण वाळूने भरलेले ट्रॅक्टर (एमएच १९ सीवाय ०९४१) घेवून तो गावाकडे जात होता. या पथकाने ट्रॅक्टरला अडविले.

तो तरुण विना पास, परवाना वाळू वाहतूक करताना आढळला. त्यामुळे त्याच्या विरुद्ध तलाठी अरविंद मोरे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करुन ते तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात लावले आहे. तपास नाईक सुशील पाटील करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com