जळगावात पुन्हा तीन करोना बाधित रुग्ण आढळले ; रूग्णांची संख्या झाली १४
Featured

जळगावात पुन्हा तीन करोना बाधित रुग्ण आढळले ; रूग्णांची संख्या झाली १४

Rajendra Patil

येथील कोविड रुग्णालयात दि.21 एप्रिल रोजी कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या तीनही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे.

या तीन रुग्णांमध्ये मलकापूर, जि.बुलढाणा येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर भुसावळ येथील 43 वर्षीय महिला व अमळनेर येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. अमळनेर येथील या व्यक्तीचा दि. 23 रोजी मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आता करोना बाधित रुग्णांची संख्या 14 इतकी झाली असून यापैकी एक रुगण बरा होऊन घरी गेला आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यु झाला असून उर्वरित 10 रुग्ण कोरोना संसर्ग कक्षात उपचार घेत आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैंरे यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com