पाळधी : कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांनी केला सत्कार
Featured

पाळधी : कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांनी केला सत्कार

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा आपल्या मूळ गावी पाळधी येथे दाखल होताच मोहम्मद ताहेर पटणी उर्दू हायस्कूल पाळधीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणांनी सत्कार केला.

यावेळी विद्यार्थ्यांनी ना.गुलाबराव पाटील यांना आपल्या सोबत फोटो घेण्याचा आग्रह केला असता ना.श्री.पाटील यांनी स्वतः विद्यार्थ्याजवळ जात त्यांना आपल्या कुशीत घेऊन फोटो काढला.

यावेळी मुख्याध्यापक मुश्ताक करीमी, सईद शहा, इक्बाल खान, नईम बिस्मिल्ला, जहूर देशपांडे व वसीम शेख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कारही करण्यात आला.

या आगळ्यावेगळ्या सत्कार सोहळ्यात हाजी यासीन, शकील उस्मान ,अकील खान शाहरुख शेख, आसिफ खाटीक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com