नंदुरबार : जिल्ह्यात करोनाचे पुन्हा तीन रूग्ण
Featured

नंदुरबार : जिल्ह्यात करोनाचे पुन्हा तीन रूग्ण

Rajendra Patil

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात अजून तीन रुग्ण करोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यात अक्कलकुवा येथील दोन तर शहादा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णांना यापूर्वीच क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आठवडाभरापुर्वी कोरोनाचा एकही रूग्ण नव्हता. मात्र, आता एक दोन दिवसाआड़ पॉझिटीव्ह रूग्ण आढळत असल्याने ग्रीन झोन मध्ये असलेला जिल्हा ऑरेंज झोन कडे वाटचाल करु लागला आहे. काल एकूण 66 व्यक्तींचे कोरोना अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 63 निगेटिव्ह व 3 पॉझिटिव्ह आलेले आहेत.

कोविड 19 चा संसर्ग झालेल्या त्या 3 व्यक्ती पूर्वीच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्क साखळीतील आहेत. त्यात अक्कलकुवा येथील 23 व 48 वर्षीय महिला आणि शहादा येथील 48 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. या तिन्ही संशयितांना पूर्वीच क्वॉरंटईन करण्यात आले होते.

या तीन रुग्णांसोबतच आता जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या 11 झाली आहे. यात नंदुरबारातील 4 , शहादा येथील 4 तर अक्कलकुवा येथील 3 रूग्णांचा समावेश आहे. यात शहादा येथील एकाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा आता डेंजर झोनमध्ये आहे.

Deshdoot
www.deshdoot.com