यावल शहरात करोणाचा दुसरा बळी ; सतर्कतेची गरज
Featured

यावल शहरात करोणाचा दुसरा बळी ; सतर्कतेची गरज

Rajendra Patil

यावल – प्रतिनिधी

यावल शहरातील काल एका करोना पॉझिटिव आलेल्या इसमाचा मृत्यू झाला होता. तरी 19 तारखेला महिला पॉझिटिव रिपोर्ट आला होता   त्या महिलेचाही मृत्यू झाल्याने आता यावल शहरात कोरोणाचा दुसरा बळी गेलेला आहे.

त्यामुळे यावल शहरात एकच खळबळ उडाली असून ज्या एरियामध्ये कोरोणाचे रुग्ण आढळले ताे परिसर सर्व सील करण्यात आलेले आहे.

मात्र शहरातील अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी काल दिले होते

नगर परिषदेतर्फे शहरात सर्वतोपरी बंदोबस्त व स्वच्छता करण्यात येत असली तरी आता दोन रुग्ण दगावले यामुळे त्यांच्या कामकाजावर मोठा ताण येणार आहे पोलीस प्रशासन गेल्या दीड महिन्यापासून पोलीस गाडीवर शहरात लाऊड स्पीकर अणे जनतेला सूचित करीत आहे तरी आजही 20 टक्के नागरिक तोंडाला मास बांधत नाहीत आतापर्यंत साडेचारशे मास न बांधणाऱ्या इस मान वर गुन्हे दाखल करण्यात आले असून अडीच ते तीन लाखापर्यंत दंड वसूल झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते यावल शहरात व तालुक्यात फैजपूर कोरपावली दहिगाव येथे रुग्ण आढळलेले आहेत त्यामुळे आता तालुक्यातील चिंतेत भर पडलेली आहे

Deshdoot
www.deshdoot.com