जळगाव : पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने जेलरक्षकास केली मारहाण
Featured

जळगाव : पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने जेलरक्षकास केली मारहाण

Rajendra Patil

जळगाव –

पॅरोलवर सुटलेल्या अमळनेरातील एका आरोपीने येथील उपजिल्हा कारागृहातील एका जेलरक्षकास बुधवारी रात्री 9.10.वाजता मारहाण केला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे.

अमळनेर येथील राज वसंत चव्हाण हा आरोपी एका गुन्ह्यात जळगावातील उपजिल्हा कारागृहात होता. त्याची पॅरोलवर सुटी झालेली आहे. परंतु, काराग्रृहात असताना त्याचा वाद जेलरक्षक कुलदीप सुंदर दराडे यांच्याशी काही कारणावरुन झाला होता. या पूर्ववैमनस्यातून राज चव्हाण याने जेलरक्षक कुलदीप दराडे यास बुधवारी रात्री कारागृहाच्या प्रवेश द्वाराजवळ मारहाण केली.

याबाबत दराडे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात राज वसंत चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास एपीआय दिलीप शिरसाठ करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com