Featured

जळगाव : तरसोद येथील 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Rajendra Patil

तरसोद  ता. जळगाव
येथे 70 वर्षीय वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती.

त्या वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच आरोग्य यंत्रणा कामाला लागून आरोग्य यंत्रणेसह ग्रामपंचायतीने व ग्राम कोरोना समितीने योग्य त्या उपाय योजना सुरू केल्या होत्या.

मात्र या परिवारातील 11 जणांना काॅरंटाईन केले होते त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला.
असे असले तरी कोणाचा धोका टळलेला नसून सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या त्या वृध्दाची तब्येत चांगली होऊन निगेटिव रिपोर्ट येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com